कै.भास्कर शिनगारे यांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजन
किल्ले धारूर शहरातील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलासवासी भास्करराव शिनगारे यांच्या २५ पुण्यतिथी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व दिवस स्पर्धेचे आयोजन दिनांक १२ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी करण्यात आले असल्याचे भास्कर प्रेम प्रतिष्ठान व कैलासवासी भास्कर शिंगारे मित्र मंडळ राजा कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धारूर शहरातील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे भाग्यविधाते भास्करराव शिनगारे यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व दिवस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्राथमिक गटासाठी वक्तृत्व स्पर्धा जनता प्राथमिक विद्यालयांमध्ये होणार असून यासाठी अरे माणसा माणसा कधी होशील रे माणूस हा विषय देण्यात आला आहे या स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत
तसेच माध्यमिक गटासाठी वादविवाद स्पर्धा जनता माध्यमिक विद्यालय मध्ये होणारा
स्पर्धेतून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनात पारितोषिके देण्यात येणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांच्या अपयशाला पालकांना जबाबदार धरणे योग्य की अयोग्य हा विषय देण्यात आला आहे. स्पर्धेला नियम व अटी असून याबाबतची सर्व माहिती आयोजकांकडून उपलब्ध होणार आहे.
या स्पर्धेसाठी जनता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वास शिनगारे मो. नंबर ९४ २१ २७ ६४ १७ तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा गायकवाड मोबाईल नंबर ९४ २०० २७३२९, सौ जयश्री रणदिवे मॅडम ९२८४५७६७७१, सौ उज्वला शिनगारे मॅडम ९८३४४९९८६५, मंत्री सर ९८९००७८५९१ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन कैलासवासी भास्कर प्रेम प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.