कै. गजानन डुबे यांचा दुसरा स्मृतिदिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा कै. गजानन डुबे सामाजिक प्रतीष्ठानच्या वतीने १२० मोफत मोतिबिंद तपासणी, ४० शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य-पदवीधर विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप.
किल्ले धारूर कै. गजानन डूबे सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स नेत्र रूग्णालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 21 जुलै रोजी नागरेश्वर मंदिर, धारूर येथे 120 मोफत मोतीबिंदू तपासणी व 40 शस्त्रक्रियासाठी धारूर शहरातील शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप पुढील पदवी अभ्यासासाठी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार कै. गजानन डुबे यांचा दुसरा स्मृतिदिन सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष सराफ सुवर्णकार असोशीयशनचे अध्यक्ष रामचंद्र निर्मळ तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ अर्बन का बैकेचे माजी चेअरमन विकासराव डुबे नेत्रतज्ञ डॉ. एकनाथ शेळके डॉक्टर असोशीयशनचे अध्यक्ष डॉ. मयुर सांवत आर्य वैश्य महासभा अध्यक्ष सुमित रुद्रवार कार्याध्यक्ष सुर्यकांत महाजन तालूकाध्यक्ष आनंद भावठाणकर, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुप्रिया चिद्रवार तालूकाध्यक्ष अपर्णा शेटे पत्रकार अतुल शिनगारे अनिल महाजन यांच्या उपस्थितत
कार्यक्रमाला सुरूवात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली सर्वप्रथम कै. गजानन दुबे यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांचे कार्याला उजाळा देणारी चिञफित दाखवली.
मान्यवराकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्या वाटप करण्यात आले उच्च शिक्षणा साठी बिन व्याजी कर्जाचे धनादेशाचे वितरण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष सराफ सुवर्णकार असोशीयशनचे अध्यक्ष रामचंद्र निर्मळ, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ अर्बन का बैक़ेचे माजी चेअरमन विकासराव डुबे, नेत्रतज्ञ डॉ. एकनाथ शेळके, आर्य वैश्य महासभा अध्यक्ष सुमित रुद्रवार, कार्याध्यक्ष सुर्यकांत महाजन , तालूकाध्यक्ष आनंद भावठाणकर, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुप्रिया चिद्रवार , तालूकाध्यक्ष अपर्णा शेटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक निमेश चिद्रवार यांनी केले अभार प्रतिष्ठानचे सचिव आनंद डुबे यांनी .
यावेळी किल्ले धारूर युथ क्लबचे अध्यक्ष व सदस्य,रोटरी क्लबचे सदस्य , कै. गजानन डुबे यांच्यावर प्रेम करणारे मित्र परिवार, आर्य वैश्य महासभाचे पदाधिकारी व सदस्य किल्ले धारूर शहरातील नागरिक आणि महिला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै. गजानन डूबे सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले.