राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग विषयावर कार्यशाळा संपन्न विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासासंबंधी निर्भीडपणे पोलीस स्टेशनमध्ये येऊन संपर्क साधा :- पोलीस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे

किल्ले धारूर 20 जुलै रोजी राजमाता जिजाऊ महाविद्याल यामध्ये अँटी रॅगिंग सेलच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून धारूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या पोक्सो कायदा, अँटी रॅगिंग कायदा समजावून देऊन त्याची भीषणता व भविष्यात होणाऱ्या दूरगामी परिणामांची माहिती विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच खाजगी, शासकीय शाळा, वस्तीगृहे, क्लासेस अशा विविध ठिकाणी विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासासंबंधी निर्भीडपणे पोलीस स्टेशनमध्ये येऊन संपर्क साधल्यास समस्येचे निराकरण केले जाईल असे सांगितले. अध्यक्षीय समारोपातून उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे यांनी अँटी रॅगिंग सेल व त्याचे कार्य महाविद्यालयात कसे चालते या संबंधी माहिती मिळाली तसेच या व्याख्यानातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यावर असलेल्या उपाययोजनासंबंधी सविस्तर माहिती मिळाली असे सांगितले. अँटी रॅगिंग सेलचे प्रमुख उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या अँटी रॅगिंग कायद्यासंबंधी विद्यार्थ्यांना जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, प्रभारी कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. नागोराव वाघमारे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *