शालेय पोषण आहार कामगारांच्या लढ्याला यश , एक हजार रुपये मानधनात वाढ :- कॉ डॉ अशोक थोरात

शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ करावी असे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सिटू च्या वतीनेबऱ्याच दिवसा पासून करण्यात येत होती त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 5 जुलै 2024 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात 1 हजार रुपयाची वाढ केली आहे . असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनचे राज्य सरचिटणीस कॉ डॉ अशोक थोरात यांनी माहिती दिली .

याबाबत सविस्तर असे की राज्यामध्ये 1 ली ते 8 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणाऱ्या कामगारांमध्ये विधवा , परितक्या , घटस्फोटीत , दलित , ओबीसी व गरीब घरातील गरजू महिला व पुरुष 2 लाख 36 हजार 227 एवढे काम करतात त्यांना शाळेमध्ये अनेक प्रकारची कामे करावी लागतात वर्ग खोल्या साफ करणे , वरंडा साफ करणे , शाळेचा परिसर स्वच्छ करणे , झाडांना पाणी देणे , शाळेभोवतालचे गवत काढणे , किचन शेड साफ करणे , शालेय पोषण आहार शाळेत शिजून देणे इत्यादी सह अनेक कामे करावे लागतात . त्यामध्ये त्यांचा 6 तास वेळ जातो त्या बदल्यात शासनाकडून त्यांना 2500 रुपये महिना मानधन म्हणजे 83 रुपये रोज याप्रमाणे महिना दिला जातो . 2500 रुपये मध्ये महिना कसा भागवायचा त्यांच्या समोर खुप मोठ आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता . त्या कामगारांनी सीटू संघटनेच्या माध्यमातून 13 सप्टेंबर 2023 रोजी व 26 मार्च 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढून शासनाकडे मानधन वाढीची मागणी केली होती . तसेच 5 जुलै 2024 रोजी शालेय शिक्षण मंत्री मा ना श्री दीपक केसरकर मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन लवकरच शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ केली जाईल . दिवाळी भाऊबीज , 10 महिने ऐवजी 12 महिने मानधन द्या . इत्यादी सह अनेक मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले . यावेळी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ प्रा ए बी पाटील राज्य सरचिटणीस कॉ डॉ अशोक थोरात राज्य कोषाध्यक्ष कॉ मिरा शिंदे कॉ अनिल मिसाळ कॉ मनसुरभाई कोतवाल सौ नंदा बांगर श्री संतोष शिर्के सौ हेमलताताई शेळके इत्यादी या शिष्टमंडळामध्ये होते . या वेळी शिक्षण मंत्री मा ना श्री दीपक केसरकर यांनी असे सांगितले की लवकरच शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ केली जाईल त्याच अनुषंगाने 5 जुलै 2024 रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात 1000 रुपयाची वाढ केली आहे . त्याबद्दल सर्वच शालेय पोषण आहार कामगार संघटणा फेडरेशनच्या पदाधिकारी व कामगारांना खुप आनंद झाला आहे . या मध्ये कॉ कल्पनाताई शिंदे , कॉ मधुकर मोकळे , कॉ प्रभाकर नागरगोजे , कॉ गंगाधर गायकवाड कॉ अनिल कराळे कॉ प्राची हातिवेलेकर , कॉ बाबासाहेब पाटोळे कॉ रामचंद्र बरफ , तानाजी कुंभार , निवेदिता मासमकर , कुसुम देशमुख , दिलीप पोपळे कॉ लता खेपकर , कॉ मोहन ओव्हाळ , अरुण कातखडे , कॉ पंजाबराव गायकवाड , ज्ञानेश्वर वाघमारे , कॉ भैय्या देशकर , कॉ शरद पाटील , वैशाली मुजेवार , शमीम पठाण अनिता राऊत , प्रतिभा आत्राम , संगिता चौधरी , सुवर्णा भुजबळ , विद्या मिसाळ , शिकत टंगल कॉ सुरेखा जाधव , सोपान चव्हाण , सुप्रिया खोमणे , शितल दळवी , गणेश जाधव , चंद्रकांत ससाने इत्यादी सह अनेक फेडरेशन च्या सर्व पदाधिकारी यांना आनंद व्यक्त केला आहे .

One thought on “शालेय पोषण आहार कामगारांच्या लढ्याला यश , एक हजार रुपये मानधनात वाढ :- कॉ डॉ अशोक थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *