राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन धावणे स्पर्धेत यश
किल्ले धारूर 18 जुलै रोजी राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेड रिबन क्लब जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने आयोजित रेड रन मॅरेथॉन स्पर्धा 2024 मध्ये पाच किलोमीटर धावणे स्पर्धेत महाविद्यालयातील चि. सागर भाऊसाहेब औताडे व हुजेफ गौस जलधर यांनी यश संपादन केले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाकरिता उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.