सुनील कावळे यांच्याकडून विभूते कुटुंबीयांना 10 हजार रुपयांची मदत करून केला वाढदिवस साजरा

किल्ले धारूर शहरातील गायकवाड गल्ली येथील तरुण दत्ता विभुते यांचा अपघात होऊन दि.01/03/24 रोजी निधन झाले होते घरातील कर्ता माणूस गेल्याने विभुते कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तसेच विभुते कुटुंबाला आर्थिक चन चन जाणवत आहे याची जाण ठेवून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील कावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत नंदनी दत्ता विभोते या 13 वर्षीय मुलीच्या नावाने दहा हजार रुपयांची fd एकटी करून विभुते कुटुंबीयांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत केली आहे त्यांच्या या निर्णयाने समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेज निर्माण झाली आहे लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठे खर्च करून साजरी करण्यात येत आहेत अतिरेकी सजावट फुगे पुणे मेंबर त्या जाळणे फटाके वाजवणे बॅनर बाजी करून वाढदिवस साजरा करण्याची स्पर्धा सध्या पाहायला मिळत आहे मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा पाढण्याची गरज आहे हीच बाब लक्षात घेऊन धारुर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील कावळे यांचा वाढदिवस 17 जुलै रोजी संपन्न झाला त्यांनी वाढदिवसाला इतरत्र होणारा खर्च टाळून सामाजिक उपक्रम समाजाला एक आदर्श असा वाढदिवस साजरा केला त्यांनी धारूर
शहरातील गायकवाड गल्ली येथील तरुण दत्ता विभुते यांचा 1 मार्च रोजी दोन चाकी वाहनावर अपघातात होऊन उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. घरातील कर्ता माणूस गेल्याने विभुते कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे लक्षात घेता पत्रकार सुनील कावळे यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून विभुते कुटुंबाला आर्थिक चन चन जाणवत आहे याची जाण ठेवून आपल्या वाढदिवसानिमित्त दत्ता विभुते यांची 13 वर्षीय मुलीच्या नावे बँकेमध्ये दहा हजाराची एफडी जमा करून वाढदिवस साजरा केला. तसेच या विधवा महिलेला शासनाची मदत मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात पाठपुरावा केला आहे. सुनील कावळे यांनी सामाजिक संदेश देऊन वाढदिवस साजरा केल्याने या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *