राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये वसंतराव नाईक जयंती निमित्ताने अभिवादन

किल्ले धारूर 1 जुलै रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये दिनांक 01 जुलै 2024 रोजी हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनायक कापावार यांबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *