राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

किल्ले धारूर दिनांक – 20 जून रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने महाविद्यालयातील 12 बोर्ड परीक्षा उत्तीर्ण व NEET साठी पात्र सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. लोभाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या समारंभास महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य डॉ. राम शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये विज्ञान शाखेतून सर्वप्रथम कु. थोरात देवयानी धनंजय 89.00%, द्वितीय कु. मुंडे साक्षी संदीप 87.17% व तृतीय क्रमांक कु. शिनगारे विशाखा विजय 86.50% या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. वाणिज्य शाखेतून प्रथम कु. पवार ऋतुजा शंकर 84.33%, द्वितीय क्रमांक कु. उडगे तेजस्विनी नारायण 82.83% तर तृतीय क्रमांक कुरवडे प्रतीक रतन 76.67% या विद्यार्थ्यांनी मिळविला. कला शाखेत प्रथम क्रमांक कसपटे रत्नेश्वर लहू 70.83%, द्वितीय कु. गिरी राधा भीमराव 70.50% तर तृतीय क्रमांक कु. जाधव रेणुका शंकर 69.33% यांनी प्राप्त केला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2024 बारावी बोर्ड परीक्षेत तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या NEET परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये कु. वैष्णवी राम शिनगारे (631), कु. सानिका संदिपान काकडे (625), चि. ज्ञानेश्वर शंकर नागरगोजे (602), कु. देव्यानी धनंजय थोरात (554), कु. पल्लवी बिभीषण गांधले (546) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे स्वागत व सत्कार महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. लोभाजी चव्हाण, डॉ. राम शिनगारे, प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. राम शिनगारे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्याने अभ्यासाची आचारसंहिता बाळगली की यश संपादन करता येते. यामुळे महाविद्यालय व पालकांचे नाव उज्वल होते असे सांगितले. प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या आयोजनाची भूमिका सांगितली. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे सांगितले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. कल्याण सावंत यांनी सत्कार समारंभ आयोजनातून गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक झाल्याने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळेल असे सांगितले. महाविद्यालयातील आजी विद्यार्थ्यांसाठी माझे विद्यार्थी संघ विविध प्रकारे कार्य असल्याची माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे सदस्य प्राचार्य विजय शिनगारे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या समारंभातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन नेत्रदीपक कामगिरी करावी असे सांगितले. या समारंभाकरिता विचारमंचावर माजी विद्यार्थी संघाचे सदस्य पत्रकार श्री. अनिल महाजन, श्री. डी. के. थोरात, श्री. गायकवाड , प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांची उपस्थिती होती. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, प्रा. गहिनिनाथ गोयेकर, प्रा. सच्चिदानंद ढेपे, प्रा. प्रताप भानुसे, प्रा. टी. एन. ढवळे, प्रा. जगदीश शिंदे, प्रा. धनराज सोळंके, प्रा. संदीप गायकवाड, प्रा. विराज देशमुख, प्रा. रागिनी सोनवणे, प्रा. राम लोखंडे, प्रा. बांगर, प्रा. कोमल सोळंके, प्रा. वैरागे या सर्व प्राध्यापक मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ. नितीन कुंभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *