क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती : – प्रियांका खिंडरे

किल्ले धारूर येथील ज्येष्ठ पत्रकार उद्योजक सदानंद खंडारे यांची मुलगी प्रियांका खिंडरे महाराष्ट्र शासना तर्फे घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले व क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
किल्ले धारूर येथील जनता विद्यालय येथे दहावीपर्यंतचे शिक्षण प्राप्त करून पुढील शिक्षणासाठी नेवासा येथील त्रिमूर्ती निवासी विद्यालय येथे प्रवेश घेतला.
त्रिमूर्ती संकुल येथे ११ आणि १२ वी शिक्षण घेत असताना धनुर्विद्या खेळाशी ओळख झाली. श्री अभिजीत दळवी सरांच्या मार्गदर्शन खाली अनेक राज्य स्पर्धा मध्ये पुणे, अमरावती, कोल्हापूर अशा ठिकाणी सहभाग नोंदवला व शाळेसाठी अनेक पारितोषिक मिळवली.
पुढील शिक्षणासाठी पुणे युनिव्हर्सिटी सिंहगड कॉलेज मध्ये प्रवेश केला.
पदवी चे शिक्षण घेत असताना सिंहगड कॉलेज
श्री रंजीत चामले यांच्याकडे धनुर्विद्या खेळाचा सराव सुरु च ठेवला. सिंहगड कॉलेज तर्फे पंजाब राजस्थान हरियाणा तामिळनाडू अशा अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. अनेक राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत सुवर्ण, रोप्य तसेच कांस्य पदके मिळवली.
कॉलेज मधील
अनेक नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करत राहिले. झोनल अमरावती , नॅशनल लेवल १ आणि लेव्हल २ कोचिंग प्रशिक्षण चेन्नई मध्ये प्राविण्य मिळवले. यामध्ये स्विझरलँड येथे भारत सरकार तर्फे जाण्यासाठी योग प्राप्त झाला, आणि स्वित्झर्लंड येथे वर्ल्ड आर्चरी लेवल १ सर्टिफिकेट कोर्से साठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि इंडियन आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया मार्फत सहभाग नोंदवून तेथे प्राविण्य मिळवले व देशाचे नाव उज्ज्वल केले. तसेच अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकाना मार्गदर्शन केले.
त्यानंतर एम पी एस सी चे परीक्षा दिली आणि घवघवीत यश प्राप्त करून आज किल्ले धारूर ची प्रियंका खिंडरे क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली सर्वत्रे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *