धारूर तालुक्यात पाच सखी, दोन आदर्श तर एक दिव्यांग मतदान केंद्र*

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व मतदार मतदानाकडे आर्कषक होण्यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत असुन, यंदा धारूर तालुक्यात पाच गावात सखी मतदान केंद्र, दोन गावात आदर्श मतदान केंद्र तर एका गावात दिव्यांग मतदान केंद्र करण्यात आले आहेत. सखी मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असणार असल्याची माहिती धारूर तालुका निवडणूक अधिकारी सुरेश पाळवदे यांनी दिली.सखी केंद्रांवर मतदान प्रतिनिधी म्हणून महिला असाव्यात अशी अपेक्षा ही पाळवदे यांनी व्यक्त केली.
बीड लोकसभा मतदार संघात आज मतदान होत असुन, या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी व मतदारांनी मतदान करण्यास उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवत आहे.धारूर तालुक्यात यंदा सोनीमोहा, भोपा,संगम, चिंचपुर, अरणवाडी या गावात सखी मतदान केंद्र करण्यात आले आहेत. या पाचही सखी मतदान केंद्रावर सर्वच महिला कर्मचारी असणार आहेत. तर तेलगाव व धारूर या दोन ठिकाणी आदर्श मतदान केंद्र आहेत. तर धारूर येथील वडारवाडा हे खास दिव्यांग मतदान केंद्र करण्यात आले आहे.या सर्व मतदान केंद्रांवर आर्कषक सजावट करण्यात आली असुन, मतदान केल्यानंतर मतदारांना सेल्फी फोटो घेण्यास सेल्फी पाॅईंटी करण्यात आले आहेत. अशी माहिती धारूर तालुका निवडणूक अधिकारी सुरेश पाळवदे यांनी दिली.पाच ठिकाणी असलेल्या सखी मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून महिला असाव्यात अशी अपेक्षाही पाळवदे यांनी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीसाठी तालुक्यात १२१ मतदान केंद्र असुन, या सर्व मतदान केंद्रावर मतदानाची पुर्ण तयारी झाली असल्याचे ही पाळवदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *