मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो..!

दत्ता बारगजे समाजसेवक बीड
मतदार जनजागरण सप्ताह चा आज समारोप, हस्ते. जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधकारी, बीड. मा. दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलिस अधिक्षक मा. नंदकुमार ठाकुर.
खेड्या पाड्यात अन् वाडी- वस्ती, तांड्यावरून फिरण्याचा या निमित्ताने योग आला. अनेक जण चमकून पाहत होते, प्रचार करतोय की काय? असा संभ्रम मनात दिसत होता,जवळ येण्यासाठी दचकत होते, चकार शब्द काढत नव्हते, एकमेकांच्या तोंडाकडे पहात भीती व्यक्त करत होते, त्यांना लोकशाहीचा अर्थ कोणीही समजावून सांगितला नसावा, अनेक ठिकाणी बोलत कुण्या पक्षाकडून आलात, कोणाला करावे कानात सांगा, एकंदर लोकशाही गहान टाकली होती, सशाप्रमाणे काळीज, तोंड दाबून बुक्यांचा मार, कैफियत मांडावी तरी कोणाकडे..?
त्यांचा कुणावरच विश्वास नव्हता..!
लूट, लुबडनुक, धोका, अविश्वास आणि काळापुरता वापर अस बीचकणार वातावरण होतं, एके ठिकाणी शाब्दीक बाचाबाची व हमरीतुमरीवर आले, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका ते तसलं तिकडेच ठेवा,
ओठात एक अन् पोटात एक सांगू नका, असं बरच काही बरळत होती, हे सर्व मी स्वतः अनुभवत होतो, त्यांच्या हाती संविधानाची उद्देशिका देत असता त्यावर कोणतेच चिन्ह नाही मग कसं..? असं विचारीत,
डॉ. बाबासाहेबांनी मजबूत घटना, बळकट लोकशाही दिली. त्याचा वापर करा, कोंबड -बकर, दाम – पाणी घेऊन विकू नका असं सांगताना मलाही घाम फुटत होता,
कसंबस स्वतःला वाचवीत सुरक्षित मी माझी जनजागरण फेरी संपवली.लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *