थोर समाज सुधारक संत महात्मा बसवेश्वर महाराज यांची 919 वी जयंती किल्ले धारूर शहरात उत्साहात साजरी.

अक्षय्य तृतीया अनेकार्थाने महत्त्वाची ठरते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू मानले जातात. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात, असे सांगितले जाते. संत बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा.
मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दाम्पत्यापोटी २५ एप्रिल ११०५ रोजी अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी ते शिवज्ञान मिळविण्यासाठी कुडलसंगम येथे भगवान शिवाच्या मंदिरात गेले. हे पाशुपत शैवांचे (शिवाचे) प्राचीन अध्ययन केंद्र होते. बसवेश्वरांनी तेथे एक तप म्हणजे १२ वर्षे वास्तव्य करून अध्ययन केले. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म व तत्वज्ञानाचा अभ्यास केला,
धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. बसव, बसवाण्णा, बसवराय अशा नावांनी ते प्रसिद्ध होते.
अशा महाविभूती संत महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती किल्ले धारूर शहरात साजरी करण्यात आली प्रसंगी
प्रवीण शेटे, ज्ञानेश्वर शिंदे, आसाराम भारस्कर,सोमनाथ शिनगारे,नितीन शेटे, आश्विन गुळवे, गणेश कापसे, अजित इंदोरे,कृष्णा थोरात, निखिल शिंदे, राजू हजारी व इतर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *