राष्ट्र संत भगवान बाबांच्या आशिर्वादाचे फळ म्हणजेच माझे यशस्वी जीवन-प्रा.ईश्वर मुंडे

राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या पावन चरण स्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बोडखा (कासारी) ता.धारूर येथे सर्व गावकरी व संत भगवान बाबा यांच्या ईतर भक्तांच्या सहकार्यातून राष्ट्र संत भगवान बाबा यांचे सुंदर मंदिर निर्माण झाले.
मंदिरातील नयनरम्य मुर्ती साठी सरपंच आशोक तिडके व उद्योजक मधुकर तिडके यांनी सहकार्य केले.
प्रथे प्रमाणे कलशासाठी गावातील सर्व मुलींनी सहकार्य केले. दि.२६/०४/२०२४ शुभ मुहुर्तावर कलश मिरवणूकीनंतर कलशारोहन करण्यात आले.
या वेळी चंद्रशेखर बाबा मठ संस्थानचे ह.भ.प.आप्पासाहेब चौरे महाराज यांचे किर्तन संपन्न झाले.
किर्तनानंतर सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून महाप्रसाद पंगत झाली.
राष्ट्र संत भगवान बाबा यांना प्रा.ईश्वर मुंडे यांच्या आई कडील पंजोबा स्व.धोंडीबा तिडके यांनी सर्व प्रथम बोडखा गावात आनले होते.
या गावात श्री दत्त जयंती दिवशी रोकडोबा ग्राम दैवताला बकऱ्याच्या मटनाचा नैवेद्य देतात ही अघोरी प्रथा संत भगवान बाबांनी किर्तनातून प्रबोधन करून बंद केली.
गावाचे नाव बोडखा असल्याने या वेळी संत भगवान बाबांनी डोक्यावर फेटा किंवा टोपी न घालताच बोडक्या डोक्याने किर्तन केले अशी अख्याईका आहे.
श्री संत भगवान बाबा यांच्या मंदिर बांधकामात देणगीदार म्हणून खारीचा वाटा उचलणारे व गावचे भाच्चे म्हणून प्रा.ईश्वर मुंडे यांचा गावकऱ्यांनी सत्कार केला.
सत्कार प्रसंगी प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,
श्री संत भगवान बाबांच्या सहवासातील व सेवेकरी कुटुंबात माझा जन्म झाला हे माझे भाग्य असून श्री संत भगवान बाबांच्या आशिर्वादाचे फळ म्हणजेच माझे सर्व क्षेत्रातील यशस्वी जीवन आहे.
या वेळी देणगीदार व संत भगवान बाबा भक्त मा.बाळासाहेब सानप,मा.प्रदिप नेहरकर,मा.प्रा.विजयकुमार मुंडे,मा.तुकाराम तिडके यांचा गावकऱ्यांच्या वतीने सरपंच आशोक तिडके,माजी उप सरपंच बाबुराव तिडके,राम तिडके,सुभाष तिडके,नंदू तिडके,बालासाहेब तिडके,बंडू शिंदे यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *