यडीची कथा- भाग- २
विरोधकांवर करण्यासाठी कुरघोडी कमळाबाईने पाळली एक यडी ॥१॥
कथित घोटाळा महाराष्ट्र सदनात ओ.बी.सी. नेता गेला तुरुंगात 11२11
यडीने लावला गळ्याला फासा टि.व्ही. वर “आर्जुन” रडे ढसाढसा ।।३।।
सतरा कोटींचा कथित भ्रष्टाचार भयभीत महिला वर्षभर फरारII४ll
“भावना” झाली साहेबाची सखी भावाला बांधली दिल्लीमध्ये राखी ॥५॥
“स्वाभिमानी” नेता, त्याची दोन पोरं त्यांच्यावर केला आरोपांचा भडीमार ।।६।।
एकाला केले मंत्री, दुसरा आमदार तिघांचाही केला मोठा पाहुणचार ॥७॥
सापळ्यात गेलेल्या, वाघाला दिसे मरण वाघीण गेली शिका-याला शरण ॥८॥
विचाराला “विचित्र” कलाटणी दिली पुरोगामी वाघीण प्रतिगामी झाली 11९11
कंपनीत केला कथित अपहार यडीच्या धाडीने नेता बेजार ॥१०।।
मातोश्रीला पत्र लिहून “प्रताप” केला गुवाहाटीच्या ताफ्यात आत्मा शांत झाला11११।।
परदेशामध्ये पैसा गुंतविला
फेमा कायदयाचा म्हणे भंग केला ॥१२॥
पती- पत्नी गेले नाथाच्या सोबत
गेली साडेसाती झाले “यशवंत” ।।१३।।
साडे चार अब्जांची माया जप्त केली
झोपडी योजनेची चौकशी सुरू झाली ।।१४।॥पंजाला सोडून “बाबा” दादाकडे गेला
यडीच्या जाचातून दिलासा मिळाला ॥१५11
पंच्यान्नव कोटींची बेहिशेबी संपत्ती
परप्रांतीयावर आली यडीची आपत्त ।।१६।।
“शंकरा” ची “कृपा” टळले संकट
हात फाडून, उ.प्र.मध्ये तिकिटे दिली गेली ॥१७
“आदर्श” घोटाळ्याचा गाजावाजा केला एका मुख्यमंत्र्याचा त्यात बळी गेला ॥१८॥
सोडून हाताला कमळवासी झाला आदर्श घोटाळा अदृश्य झाला ॥१९॥
नागपुरी नेता म्हणाला “डिलर” दक्षिणा देवून त्याला केले “लिडर” ।।२०ll
साडेआठशे कोटींचा विमान भ्रष्टाचार आरोप केला तत्कालीन मंत्र्यावर ॥२१।।
घड्याळ फोडून कमळाशी युती केली त्याच्या चौकशीची फाईल बंद झाली ॥२२॥ जामीनासाठी वायकर, पळाले दिल्लीना सोडली “मशाल,” दिलासा मिळाला ।।२३।। कीर्तिकराना तिकीट “मशाली” ने दिले लागलीच यडीचे आमंत्रण आले ॥२४॥
थोरल्या पवारावर यडीबाई धावली
त्यानी कायमची अद्दल घडवली ॥२५।।
लेखक
बाबुराव तिडके
अंबाजोगाई, जि.बीड, महाराष्ट्र.