मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी किल्ले धारुर येथे सायक्लोथॉन सायकल रॅली सहभागी होण्याचे तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी आवाहन केले.
किल्ले धारूर येथे उद्या दिनांक 28 एप्रील रोजी सकाळी सात वाजता तहसील कार्यालय येथून लोकसभेच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे त्याचप्रमाणे धारूर शहरातही प्रशासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सायकल रॅली सकाळी सात वाजता धारूर तहसील कार्यालयातून काढण्यात येणार आहे या सायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिक कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांनी सहभागी होऊन मतदारांमध्ये जनजागृतीचे राष्ट्रीय कार्य करावे असे आवाहन धारूर तालुक्याचे तहसीलदार जीवक कुमार कांबळे गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचे इयत्ता ९वी ते १२वीचे विद्यार्थी, सर्व स्टाफ यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकारी यांनी केले आहे. सायकलीसह विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगावे असेही मुख्याध्यापकांना पत्रद्वारे कळविण्यात आले आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी शासन विविध उपाय योजना करत आहे.