राज्यशास्त्र विभाग आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेत आदित्य गायसमुद्रे प्रथम
किल्ले धारूर 23 एप्रिल रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्ले धारूर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 28 मार्च 2024 रोजी सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या सामान्य ज्ञान परीक्षेत आदित्य अविनाश गायसमुद्रे बीए द्वितीय वर्गातील विद्यार्थी यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यास स्पर्धा परीक्षेची तयारी कशाप्रकारे करावी या संदर्भाचे ग्रंथ देऊन जागतिक पुस्तक दिनी विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक आशिष बालासाहेब शिरसाठ तर तृतीय क्रमांक हनुमंत ज्ञानेश्वर टापरे यांनी प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मेजर मिलिंद गायकवाड, ग्रंथपाल प्रा. गोपाळ सगर, डॉ. राम भोसले, प्रा.विनायक कापावार, स्पर्धा संयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.नागोराव वाघमारे, विद्यार्थी आशिष बालासाहेब शिरसट उपस्थित होते.