किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्राच्या वतीने समता पंधरवडा निमित्ताने व्याख्यान संपन्न

किल्ले धारूर 22 एप्रिल रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये समान संधी केंद्राच्या वतीने दिनांक 10 ते 25 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व बीड जिल्हा जात पडताळणी विभाग यांच्या सूचनेनुसार समता पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नागोराव वाघमारे यांनी करून कार्यक्रमाच्या आयोजना संबंधीची भूमिका सांगितली तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना व जात पडताळणी विभागाच्या वतीने जात पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे असेही सांगितले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रभारी कार्यालयीन अधीक्षक श्री. केशव भोंडवे यांनी विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, ईबीसी शिष्यवृत्ती योजना व जात पडताळणी सबंधी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने असलेल्या विविध सुविधांची माहिती सांगून कार्यप्रणाली समजावून सांगितली. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी विद्यार्थ्यांना या व्याख्यानांच्या माध्यमातून भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविलेल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळाली. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग सर्व पात्र विद्यार्थ्यांना व्हावा हा मुख्य हेतू ठेवून समता पंधरवडा सर्वत्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा होत आहे असे सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. सिद्धेश्वर काळे, प्रा. धनराज सोळंके, प्रा. प्रताप भानुसे, प्रा. रागिनी सोनवणे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागोराव वाघमारे यांनी तर आभार प्रा. सिद्धेश्वर काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *