डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

शेतकरी मित्रहो, पीक पाहणी करणे झाले अधिक सोपे व सहज ते पण आपल्याच मोबाईल द्वारे, महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप मध्ये उन्हाळी व संपूर्ण वर्ष असे दोन पर्याय उपलब्ध आहे यापैकी आपणास हवा असलेल्या हंगामातील एक पर्याय निवडून आपली पीक पाहणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲपसाठी यंदा उन्हाळी हंगामात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशा एकूण तीन हजार ३२ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचा समावेश आहे. हे सुधारित ॲप गुगल प्लेस्टोअरवर सोमवारपासून (ता. १५) उपलब्ध झाले आहे.

ई पीक पाहणी व्हर्जन ३ अर्थात डिजिटल क्रॉप सव्र्व्हेचा प्रायोगिक प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील देवळा या तालुक्यांमध्ये राबविण्यात आला. आता तो ३४ जिल्ह्यांतील गावांमध्ये राबविण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

व्हर्जन-३ ॲप का आहे महत्त्वाचे ?

ई-पीक पाहणीच्या नोंदी या पीक विमा व पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्जवाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे इत्यादी बाबींसाठी आवश्यक असल्याचे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हे लक्षात ठेवा

१. नवीन ॲपमध्ये शेतातील पिकांचे पन्नास मीटरच्या आतून दोन फोटो अपलोड करावे लागणार.

२. उन्हाळी हंगामात डिजिटल कॉप सर्व्हेच्या प्रक्रियेनुसार पीक पाहणी नोंदविली जाईल.

३. राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये पूर्वीच्या प्रक्रियेनुसार पीक पाहणी नोंदविली जाणार

४. दोन्ही प्रक्रियेसाठी एकच मोबाईल ॲपचा वापर करण्यात येणार

ॲपमध्ये सुधारणा

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार खरीप हंगाम मागील वर्षांपासून डिजिटल क्रॉप सव्र्व्हेचा पायलट प्रकल्प राबविण्याचे निश्चित केलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्रची निवड करण्यात आलेली आहे. राज्याच्या सध्या वापरत असलेल्या ई-पीक पाहणी मोबाइल ॲपमध्ये केंद्र सरकारने सांगितलेल्या अत्यावश्यक बाबींचा समावेश करून राज्याचे ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सव्र्व्हे) मोबाईल ॲपमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे सुधारित मोबाईल ॲप डाउनलोड करून उन्हाळी हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

दोन कोटींहून जास्त नोंदणी

गाव नमुना १२ मध्ये पीक पाहणीच्या पारंपरिक पद्धतीमध्ये बदल करून आपल्या शेतातील पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे करण्याची सुविधा १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये आतापर्यंत दोन कोटी १२ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे.

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी घेऊन आले आहे ई-पीक पाहणी मोबाईल ॲप. अधिक माहितीसाठी आपले गावचे तलाठी किंवा कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा. तसेच काही शंका असल्यास ०२० – २५७१२७१२ या क्रमांकावर कॅाल करून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचे निवारण करू शकता.

E-Peek Pahani ई-पीक पाहणी(DCS) ॲप : E-Peek Pahani ई-पीक पाहणी(DCS) ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *