किल्ले धारूर शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयात पिण्याचे पाणी नाही. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय
किल्ले धारूर शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय,नागरी रुग्णालय, भूमी अभिलेख कार्यालय,सामाजिक वनीकरण,अशा इतर प्रमुख कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत असून भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे.
यंदाचा उन्हाळाकठीण असून मार्च महिन्यात व एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहेसूर्य आग ओकत आहे तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक हे आपले शासकीय काम करण्यासाठी प्रमुख कार्यालयामध्ये येतात परंतु या शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक कार्यालयामध्ये गेले असता त्यांना पाणी देखील पिण्यासाठी मिळत नाही अशी शोकांतिका ऐकावयास मिळत आहे.
पाणी हे जीवन मानले जाते पाण्यामुळे थकवा दूर होतो पाण्याची शरीराला आवश्यकता असते पाणी जर पुरेशा प्रमाणामध्ये मिळाले नाही तर उष्माघातासारखे आजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात यामुळे पाणी पिणे आवश्यक आहे परंतु ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील दूरवरून आलेल्या नागरिकांना प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पिण्यास पाणी मिळणे गरजेचे आहे. वृद्ध नागरिकांचा तर जीव कासावीस होतो.
शासकीय कार्यालयात असलेले स्टॅन्ड केवळ पिण्याचे पाणी लिहिले आहे परंतु त्या ठिकाणी कुठलीही सोय दिसून येत नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.