किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

किल्ले धारूर 16 एप्रिल रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी बीड यांच्या आदेशानुसार स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुका 2024 मध्ये आपल्या पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन निरपेक्षपणे मतदान करावे असे सांगितले. मतदानाचा हक्क हा घटनेने मिळालेला सर्वोत्तम अधिकार आहे. त्यामुळे या मतदान प्रक्रियेत आपल्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मतदान करण्यासाठी प्रेरणा द्यावी असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. डी. बी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया समजावून देऊन लोकसभेची कार्यप्रणाली सविस्तर सांगितली. प्रा. नागोराव वाघमारे यांनी सर्व मतदात्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आई-वडील, पालक यांना सजग करावे व आपल्या मतदानाच्या अधिकारातून लोकसभा प्रतिनिधी निवडावा. भारतीय संविधानाने नागरिकाला मतदानाचा सर्वश्रेष्ठ हक्क प्रदान केला आहे या हक्काचा सर्वांनी उपयोग करावा असे सांगितले. याप्रसंगी विचार मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, प्रा. मांगीलाल राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *