बीड जिल्ह्यात एक मोठा उद्योग आणि सर्व सुखसोयी आणि सर्व रोगांचे निदान असलेले रुग्णालय उभारणार :- पंकजा मुंडे
बीड जिल्ह्यात एक मोठा उद्योग आणि सर्व सुखसोयी आणि सर्व रोगांचे निदान असलेले रुग्णालय उभारणार आहे.कोणालाही दाबणार नाही, कोणाकडे दबून घेणार नाही या साठी मला निवडून द्यावे ,माधव निर्मळ यांच सोनं करणार . माझ्या पाटीवर थाप मारा, मी विकासाची ओटी भरून देईल असे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सांगितले .
बीड लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ धारूर नर्मदा जिनींग येथे रविवारी कार्यकर्ताचा मेळावा घेण्यात आला . या वेळी माजी आ.आर टी देशमुख , केशव आंधळे, जयसिंग सोळंके , रमेश आडसकर, डॉ . स्वरूपसिह हजारी , माधव निर्मळ , राम कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यकर्मात बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की ,महान संताना जातीत कधीही विभाजन करू नये . कितीही दुःख संकट समोर आले तरी अहिल्या देवीनी सहन केले तसे मी सहन करण्याचे काम करत आहे . त्यांच्या सारखा कारभार कसा करता येईल या साठी प्रयत्न केले पाहिजेत . सर्व समाजाला घेवून जाण्याचे काम मुंडे साहेबांनी केले . विरोध करणारेच आज अमच्या सोबत आहेत . आता विमा मिळतो का असा प्रश्न केला पण सरकार आमचेच मग काय बोलायचे हो माझीच पंचाईत झाली असेही पंकजा मुंडे म्हणाल्या निवडणुकीत काहीच मुद्दा नसेल तर निवडणूक जातीवर जाते . ही निवडणूक कुठल्याही कारणानी लढली जाणार नसून विकासाच्या नावावर लढली जाणार आहे . कधीच जातीचे नाव घेवून लोक वागले नाहीत पण आता चित्र वेगळेच असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगून तुम्हाला न्याय देईल माझ्या पाटीवर थाप मारा, मी विकासाची ओटी भरून देईल असेही त्या म्हणाल्या . या वेळी रमेश आडसकर यांनी जाती पाती पेक्षा पुढे जाऊन आता काम करायचे आहे . माधव निर्मळ यांनी सर्व सामाजातील लोकांना पुढं आणले असल्याचे सांगितले तर जयसिंग सोळंके यांनी आज लोकशाहीत कोणाला पाडायच या साठी मतदान करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ही निवडनुक महत्त्वाची आहे . नकारात्मक प्रश्न बाजूला ठेवले पाहिजे . ताईनी सर्वशिक्षा अभियान उपक्रम पुमुख्याने राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले . माधव निर्मळ म्हणाले की महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे . आमच्याही समाजालाही वाटतय की आम्हीही लोकसेभेत जायला पाहिजे . पण आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत जास्तीचा वाटा दिला पाहिजे असेही माधव निर्मळ यांनी सांगितले . या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.