लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक.
महाराष्ट्रातील लाखो सामान्य जनांसाठीचा आश्वासक चेहरा पंकजाताई मुंडे यांच्या नियोजित दौऱ्याबाबत आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.१४ रोजी नर्मदा जिनिंग धारुर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक माधव निर्मळ यांनी दिली.
‘संघर्ष’ हा मुंडे घराण्यासाठीचा अविभाज्य शब्द आहे! किंबहूना; लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर स्वतःच्या कुटुंबात कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसतानाही केवळ गोरगरीब, दीनदलित दुबळ्या अनाथ अपंग दिव्यांग शेतकरी ऊस तोड कामगार झोपडीतल्या माणसांच्या जीवावर आणि ताकदीवर कर्तृत्वावर सर्वोच्च स्थान प्राप्त करून लोकांमध्ये ‘लोकनेता’ ही पदवी जनतेतून मिळवली. परंतु हे करताना त्यांना प्रचंड संघर्ष आत आणि बाहेर करावा लागला.
अशा या मुंडे घराण्यातील लोकनेते मुंडेसाहेबांच्याच्या नंतर सक्षम वारसा चालवणाऱ्या लोकनेत्या तथा बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा माजलगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाश दादा सोळंके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तथा बहुजन समाजाचे नेते माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प. सभापती जयसिंगभैय्या सोळंके यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी ११ वाजता नियोजित दौऱ्याच्या निमित्त नर्मदा जिनिंग केज रोड धारूर येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी समस्त माजलगाव मतदार संघातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तथा मतदार बंधु व भगिनींने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.