पत्रकार सचिन थोरात यांच्या घरावर वीज , कुटुंब बचावले
धारूर पत्रकार सचिन थोरात यांच्या घरावर विज पडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली . यामध्ये त्यांचे कुटुंब सुखरूप आहे .
तालुक्यातील पांगरी येथील रहीवाशी असलेले सचिन थोरात हे सायंकाळी घरी पोहोचले होते .यावेळी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू होता. सहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावर वीज पडली . त्यावेळेस मोठा आवाज झाला . यावेळी सर्व कुटुंब भयभीत झाली होते . मात्र यामध्ये कोणालाही विजा झाली नसून कुटुंब सुखरूप आहे . घरामध्ये एकूण सहा जण उपस्थित होते . विजेच्या धक्क्याने घरावरील एक झेंडा जळाला आहे