किल्ले धारूर महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न
किल्ले धारूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दिनांक 11 एप्रिल रोजी थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती संपन्न झाली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत शिक्षणाचे महत्त्व बहुजनांना पटवून सांगणारे तसेच विद्याविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना बहुजन खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असा विचार शिक्षणातून दिला. शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात आमुलाग्र बदल होऊ शकतो असे संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचे यावेळी स्मरण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. धनराज सोळुंके प्रा. एन. एस. वाघमारे, संजय गुरव तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.