नगरपरिषद किल्ले धारूरच्या वतीने शहरात एकूण अडीच किलो प्लास्टिक पिशव्या जप्त सातशे रुपये दंड वसूल प्लास्टिक बंदी सतत चार दिवस चालू राहणार

किल्ले धारूर नगरपरिषद वतीने एकर प्लास्टिक बंदी मोहीम दिनांक 26 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता धारूर शहरातील बाजार पेठा येथे किराणा इतर दुकानात मुख्यधीकारी नगर परिषद किल्ले धारूर महेश गायकवाड इतर कर्मचारी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, एकूण अडीच किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. आणि 700 रु.चा दंड केला.
नगर किल्ला धारूर अंतर्गत प्लास्टिक वापरावर बंदी असल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धारूर शहरातील बाजारपेठेत आज सकाळी अकरा वाजता मोहीम राबवली. यामध्ये किराणा दुकान, हातगाडे, पाण टपरी, स्टेशनरी व इतरधडक मोहीम काढण्यात आली यामध्ये एकूण 2.5 kg प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आले असून 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसेच सर्व व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी बाबत सक्त निर्देश देण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये नगरपरिषीचे मुख्यधीकारी नगर परिषद किल्ले धारूर महेश गायकवाड संजय जुजगर ( ओ. एस.)सचिन डावकर ( एस. आय.) शेख शाहजेब ( सी. सी.) अरुण वाघमारे, श्रीकृष्ण नागरगोजे, माणिक गायसमुद्रे,शेख अब्बास, मोमीन इशरत,ऋषिकेश तांबवे, माणिक लोखंडे, इतर नगरपरिषद चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *