कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण निवेदन देताच प्रत्यक्षात आठ महिन्यांनी पाईपलाईन सुरू

किल्ले धारूर नगरपरिषद स्थापन झाल्यापासून गायकवाड गल्ली परिसरात मुख्य रस्त्यावरून 200 फूट पाईपलाईन नसल्याने पंधरा ते वीस कुटुंबांना पाणीपुरवठ्यासाठी त्रास होत होता.
सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनील कावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने देऊन अखेर आमरण उपोषणाचे निवेदन दिल्याने आठ महिन्यांनी दिनांक 20 मार्च रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली.
किल्ले धारुर नगर परिषद हद्दीत येत असलेल्या गायकवाड गल्ली भागातील मुख्य रोड ते अंतर 200 फुट पाईपलाईन झालेली नाही त्यामुळे याभागात राहणाऱ्या 15 ते 20 कुटुंबियांना नाहक त्रास होतो. नळपट्टी व घरपट्टी वेळेवर भरणा करुन देखील नगरपिरषदेच्या वतीने संबंधित लोकांना सोय सुविधा मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
वेळोवेळी समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनील कावळे आणि सहकारीनी निवेदनाद्वारे कळविले असतांना सहा महिन्याचा काळ उलटुनही वरील समस्येवर नगर परिषदेने अद्याप काहीच काम केलेले दिसुन येत नाही तरी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येणार आहे.निवेदन देताच गायकवाड गल्लीत आठ महिन्याने आज प्रत्यक्षात काम सुरू झाले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश गायकवाड यांची आभार मानले.

सविस्तर पहा : –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *