सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भोगलवाडी मतदान केंद्रास भेट.
धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे 18 मार्च रोजी सायंकाळी 7.00 वाजता 39- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 229- माजलगाव विधानसभा मतदार संघ मतदान केंद्र क्र.- 356 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मध्य खोली क्र. 2 धारूर. या ठिकाणी सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री कमलेश मीना उपविभाग केज
यांची भेट दिली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना उपविभाग केज यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील मतदान केंद्रास भेट. यावेळी भोगलवाडी ग्रामभेट दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला. निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या
यावेळी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमोडे,गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.