किल्ले धारूर महाविद्यालयाच्या कृष्णा झेंडे व चाळक निकिता यांची वनरक्षक पदी निवड
किल्ले धारूर 18 मार्च रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये बीएस्सीची माजी विद्यार्थिनी कुमारी चाळक निकिता आणि कृष्णा झेंडे या विद्यार्थ्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या विभागामध्ये वनरक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पहार देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य मा. श्री. जयसिंगभैय्या सोळंके तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. लोभाजी चव्हाण, श्री. अजयसिंह दिख्खत, महाविद्यालय विकास समितीचे निमंत्रित सदस्य डॉ. राम शिनगारे, श्री. इं. ना. जाधव नवनियुक्त वनरक्षक झालेल्या कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.