अप्पर कुंडलिका योजनेचे पाणी सहा महिन्यात शहरात आणण्याचा संकल्प – माधव निर्मळ

किल्लेधारुर गेली दहा वर्षे रखडलेली धारुरकरांच्या जिव्हाळ्याची बनलेल्या अप्पर कुंडलिका पाणी पुरवठा योजनेचे पाणी सहा महिन्यात धारुर शहरात आणण्याचा संकल्प असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी दिली.

धारुर शहरातील नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचा शुभारंभ दि.१६ शनिवार रोजी सकाळी १० वाजता आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या आदेशानुसार माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आले. यात तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचा समावेश आहे. तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना निर्मळ यांनी अप्पर कुंडलिका पाणी पुरवठा योजनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. धारुर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मिटावा म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धारुर येथील जाहिर सभेत आमदार प्रकाशदादा सोळंके यांना शब्द देवून सुजल योजनेतून अप्पर कुंडलिका पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. सदर योजना गेल्या दहावर्षांपासून निधी उपलब्ध असतानाही प्रलंबित आहे. विद्यमान परिस्थितीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. यातच धारुर नगर परिषदेस कायमस्वरुपी मुख्याधिकारी म्हणून महेश गायकवाड यांची नियुक्ती झाल्यामुळे अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. याच पध्दतीने रखडलेल्या अप्पर कुंडलिका पाणी पुरवठा योजनेचे पाणी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यात धारुर शहरात आणण्याचा संकल्प असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *