तालुका कृषी कार्यालय धारूर येथे कृषी अधिकारी जनार्धन भगत रुजू कृषी अधिकारी यांचा व्यापारी व शेतकऱ्याकडून सत्कार

तालुका कृषी कार्यालय किल्ले धारूर येथे 18 मार्च रोजी कृषी अधिकारी जनार्धन भगत रुजू झाले.
तालुका कृषी कार्यालय धारूर येथे कृषी अधिकारी श्री.शरद शिनगारे यांची पदोन्नती झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कृषी अधिकारी हे पद रिक्त होते.प्रभारी कृषी अधिकारी म्हणून श्री नितीन कांबळे यांनी काम पाहिले. माजलगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जनार्धन भगत यांची आज 18 मार्च रोजी किल्ले धारूर तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती होऊन नियुक्ती करण्यात आली.
कृषी कार्यालयात आल्यानंतर धारूर शहरातील प्रतिष्ठित बाबुराव शिनगारे व नितीन जाधव व शेतकऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *