जलजीवनच्या कामाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांना आमरण उपोषणाचा इशारा.. संबंधित अधिकारी,गुत्तेदारावर कारवाई करा : – विशाल सराफ

धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी व संबंधित प्रशासन,गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त छ.संभाजीनगर यांच्याकडे केली आहे.अन्यथा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे.धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत मार्फत जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असून सदर काम अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारे पूर्णतत्त्वाकडे गेलेले नसून जल जीवन मिशन अंतर्गत मौजे गोपाळपूर,संभाजीनगर,शिक्षक कॉलनी,गोपाळपूर,भायजळी,या ठिकाणच्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने हर घर जल घर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाच्या वतीने तीन कोटी एकोणनव्वद लाख चौथीत हजार नवशे रुपये खर्च करून मौजे गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या संपूर्ण लोक वस्तीला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याच्या उद्देशाने करण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोदी व भ्रष्टाचार करण्यात येत असून सदरील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर व गुत्तेदारावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे छ.संभाजीनगर यांच्या कडे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी केले आहे.यावेळी:- वाल्हे गंगाधर,श्री माळेकर, यांच्या सह गोपाळपूर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *