*ऊसतोड मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजी नगर यांचे धारूर व केज तालुक्यात विविध उपक्रम*

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजी नगर ही संस्था गेल्या 29 वर्षांपासून ग्रामीण विकासाबरोबर विविध समाजात विविध प्रश्नाला सोबत घेऊन काम करत आहे.
धारुर तालुक्यातील गावांमध्ये प्रकल्प ओळख कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला धारूर पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंत (बाप्पा)नागरगोजे सरपंच – गोपाळ वेताळ, ऊसतोड कामगार कुटुंबातील सदस्य, अंगणवाडी, पुरुष बचत गट, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य, पाणलोट विकास समिती सदस्य व गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकल्प ओळख कार्यक्रमांमध्ये गावांमध्ये ऊसतोड कामगाराची नोंदणी व ऊसतोड कामगार समिती स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली याचबरोबर ऊसतोड कामगारांच्या मुलासोबत चिल्ड्रन ग्रुप्स स्थापन करण्यात आला. या गावांमध्ये अंदाजे 250 ते 300 कुटुंब ऊस तोडी करता स्थलांतर करतात परंतु प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषद वेबसाईटवर फक्त 41 मजुरांची नोंद आहे. ऊसतोड कामगार नोंदणीचे महत्त्व सांगून त्यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळ यांच्या विविध योजना याबाबत माहिती सांगण्यात आली. प्रकल्प ओळख कार्यक्रमात धारूर पंचायत समिती सभापती हनुमंत बप्पा नागरगोजे यांनी गावातील ऊसतोड कामगार यांना नोंदणी करण्याबाबत आव्हान केले.
हे विवध उपक्रम राबविण्यासाठी तेलगाव रोड धारूर या ठिकाणी संस्थेचे कार्यालयं असून या कार्यालय अंतर्गत प्रकल्प समन्वयक संतोष रेपे, गाव स्वयंसेवक प्रकाश काळे, शिवशंकर माने, सुनिता विभूते, निवेदिता बालमारे, राज करे, लायझनिंग ऑफीसर एच पी देशमुख इ व्यक्ती कार्यरत आहेत. तर प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांचे या कामासाठी वेळोवळी मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *