रेपेवाडी पाचीपिंपळतांडा साठवण तलावात पुन्हा दगड मिश्रीत मुरूम . अधिकाऱ्यांच्या भेटी नसल्याने गुत्तेदाराकडून थातूर मातूर काम उरकण्याचा प्रयत्न

रेपेवाडी – पाचीपिपळ तांडा साठवण तलावाचे काम सध्या सुरू आहे .यामध्ये काळी माती ऐवजी तांबड्या शेतातील तांबड्या मातीचा वापर सुरू आहे . या माती शेजारी तेथीलच दगड गोटे मिश्रीत मुरूम टाकण्यात येत आहे . कामावर अधिकाऱ्यांच्या भेटी होत नसल्याने गुत्तेदारा कडून काम उरकण्याचा प्रयत्न सुरू आहे .
तालुक्यातील रेपेवाडी , पाचीपिंपळ तांडा या ठिकाणी २००६ मध्ये साठवण तलावाचे काम मंजूर करण्यात आले होते. या साठवण तलावामुळे पाची पिपळ तांडा ‘ शिंगणवाडी येथील ४०० हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे .काम मंजूर होताच मोठ्या गतीने पटेल कंट्रक्शन कडून हे काम करण्यात आले .सन २००९ पर्यंत काम पूर्ण करण्यात आले होते , परंतु धार कोंडण्याचे काम राहिले होते .धार कोंडल्यास मोठा पाणीसाठा होऊन पाचीपळ तांडा येथील वस्तीस धोका निर्माण होत होता म्हणून काम थांबवण्यात आले होते .तब्बल दहा ते बारा वर्षे काम थांबल्यानंतर गतवर्षी आ . प्रकाश सोळंके यांनी पाठपुरावा करून पाची पिपळतांडा येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात आले .येथील ग्रामस्थांना सहानुग्रह अनुदान देण्यात आले होते .पुनर्वसन झाल्याने तलावाची धार कोढण्याचा मार्ग मोकळा होता .मागील पंधरा दिवसा पुर्वी गुत्तेदाराकडून अधिकाऱ्यांच्या स्पस्पर धार कोंडण्याचे काम सुरू करण्यात आलेले होते . या कामांमध्ये काळी माती वापरण्या ऐवजी दगड गोटे व मुरूम मिश्रित तांबड्या मातीचा वापर सुरू करण्यात
आलेला होता . ही बाब शिंगणवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर तलावाच्या कामावर जाऊन बोगस होत असलेले काम थांबवण्यात आले होते . या वेळी कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी कामास भेट देवून तांबडी माती बाजूला काढण्याच्या सुचना दिल्या होत्या . मागील चार ते पाच दिवसापासून गुत्तेदाराकडून गॉर्ज भरण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे . सदर काम करताना तलावात काळी माती भरण्याची गरज असताना एका शेतातील निकृष्ट स्वरूपाची काळी माती टाकण्यात येत आहे . तसेच या मातीच्या शेजारी मुरूम भरण्याची गरज असताना दगड गोटे असलेले खरपाड भरण्यात येत आहे . यामुळे या तलावाचा दर्जा टिकणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे . या कामाकडे कार्यकारी अभियंता तसेच उप अभियंता यांचे दुर्लक्ष होताना दिसण्यात आहे . त्यांनी वेळीच लक्ष दिल्यास कामांमध्ये सुधारणा होऊ शकते . अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लघुपाटबंधारे कार्यालय केज येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे .
– –
मुरमाची गरज
तलावाचा गॉर्ज भरताना कळ्या मातीच्या बाजूला मुरूम भरण्याची गरज असते .अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणेच हा मुरूम भरण्यात येत आहे . या कामावर उप अभियंता यांना भेटी देण्याचे सांगितले आहे .
– प्रसाद लांब, कार्यकारी अभियंता बीड .
– –
आंदोलनाशिवाय पर्याय नाही
सध्या रिपेवाडी पाची पिंपळतांडा येथील साठवून तलावाचा गॉर्ज भरण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे . या कामात निकृष्ट दर्जाची काळी माती टाकण्यात येत असून येथील दगड गोटे न उचलता त्याच ठिकाणी पोकलेन च्या साह्याने पांगवण्यात आलेले आहेत . सध्या बोगस पद्धतीने काम करण्यात येत असून वेळी सुधारणा न केल्यास आंदोलन करण्यात येईल .
– संतोष भोसले, ग्रामस्थ सिंगनवाडी

सविस्तर पहा : –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *