खळबळजनक! शिंदे गटातील ‘हे’ 12 आमदार ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार;वकील असीम सरोदेंनी दाखवली यादी वाचून

चंद्रपूर : चंद्रपूर येथील निर्भय बनो सभेत प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले,शिवसेना शिंदे गटातील तब्बल 12 आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार, तसेच त्यांनी 12 आमदारांच्या नावांची यादी ही वाचून दाखवली आहे. त्यामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानावर गुरुवारी निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांत त्यांनी हा दावा केला आहे.
ठाकरेंकडे कोण कोणते आमदार परतणार ?
दरम्यान पुढे बोलताना असीम सरोदे म्हणाले की, श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैस्वाल, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर या आमदारांच्या नावांचा समावेश आहे. या आमदारांना लक्षत आले आहे की आपले या माणसासोबत आपले भविष्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही, असा टोलाही सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी यांना परत पक्षात घेतले नाही पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे असीम सरोदे म्हणाले की, 2024 लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा आणि भाजपला सरसकट पराभूत करा, असा संदेश त्यांनी भाषणातून दिला आहे. असीम सरोदे यांच्या दाव्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *