1972चा दुष्काळ आणि आजची परिस्थिती.
१९७२चा महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ मला चांगलाच आठवतो. मि त्या वेळेस इयत्ता ७वीच्या वर्गात शीकत होतो. घरची परिस्थिति बेताचीच, घरात सरकारी नौकरी कोणालाच नाही.. माझ्या पेक्षा मोठे भाऊ तिन ते पण शिक्षण घेत होते..
वडीलांचा कापडाचा व्यवसाय.. दुष्काळा मुळे
धंद्याची वाताहात लागलेली.. रोजचे खाण्याचे वांदे.. १९७२ला महाराष्ट्राचे मुख्य मंत्री वसंतराव नाईक (वीदर्भ यवतमाळ जिव्हा, पुसद) हे होते.
त्यांनी रोजगार हमीचे कामे काढली.. आमच्या गावातील ९०टक्के लोक रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असत.. रोडची कामे जवळपास सगळी कडेच होती. तळे ,विहिरी कोरडी पडली होती ..तळ्यातील गाळ काढण्याचे कामे खेड्यापाड्यात चालू होती.. पाण्याची टंचाई, अन्नधान्याची टंचाई चांगलीच भासत होती.. भारत सरकारणे अमेरिकेतुन हायब्रीड, मिलो आणि लाल गहु जे कि जनावरे पण खात नसत असा गहु
महाराष्ट्रातील लोकांनी नाईलाजास्तव खावा लागत होता ..
पिण्यास पाणी नव्हते.. पाण्यासाठी नगरपालिकेची टॉकर येत होती.. तिन पैशाला एक घागर, ती पण लाईन लाऊनच ..तिन पैशाची पावती घेऊन मिळत होती.
जनावरांना चारा, पाणी मिळत नव्हते. ब-याच शेतकर्यानी डोळ्यावर पट्टी बांधुन आपली जनावरे देवाच्या भरोशावर सोडुन दिली.. गाई, म्हशी, बैल पण्यावाचुन तरफडून मरताना शेतकर्यानी आपल्या डोळ्यांनी पाहिली.. …
दिवसाची मजुरी पुरुषांना फक्त १.२५पैशे मिळत होती.. अणि महिलांना ७५पैशे रोज.. मला रोड वरती भावाच्या हाता खाली काम करण्याची वेळ आली होती .मला वयाच्या १२व्या वर्षी उन्हा तानात खडीचे टोपले उचलण्याची कामे करावी लागली..
सरकार सकस आहार म्हणुन मजुरांना सुकडीचे वाटप करीत होते. .सुकडी म्हणजे गुळाचा कोरडा शिराच..
पण चांगल्या क्वालिटीचा सकस आहार होता .
त्या दुष्काळात पैसाच दिसत नव्हता. हालाकीच्या
परिस्थिति मुळे माझे ७विचे वर्ष वाया गेले.
१९७३ला बर्यापैकी पाउस झाला आणि दुष्काळाची तीव्रता थोडी कमी झाली.. तो पर्यंत आम्ही दुष्काळामुळे १०वर्ष मागे गेलो होतोत ..
१९७५ला मि एस एस सी पास झालो. मला चांगलेच समजू लागले होते.. मोठा भाऊ मस्टर कारकुन या पदावर लागल.. पगार महिना १५०रु.
१९७५ला १५०रुपये खुप वाटायचे ..मला कॉलेज म्हणजे काय माहितीच नव्हते.. शिक्षणाच्या बाबतीत मार्ग दर्शन कोणाचेच नव्हते..
१९७३ला आमच्या गावात परिवहन मंत्री रामरावजी आवरगावकर यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेजची स्थापणा केली.. त्या वेळेस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामराव आवरगावर साहेब होते.
मि कॉलेच मधे एॅडमिशन घेण्यासाठी गेलो, कोणत्या फॅकल्टीला एॅडमिशन घ्यायचे हे पण कळत नव्हते. कला का वाणिज्य.. माझे डाकुमेंटस् मी
तिथे बसलेले वेल्हाळ सर जे की कॉलेज मधे क्लर्क होते त्यांच्या स्वाधीन केले.. ते म्हणाले १५दिवसानी कॉलेज सुरु होणार आहे.. तुझे एॅडमिशन झाले. ११विच्या पीरियडला बसायचे म्हणून मि खुशीत घरी आलो.. १५दिवसानी कॉलेज मधे गेलो, बसायचे कोणत्या वर्गात हेच माहीती नव्हते.. आर्ट कि कॉमर्स.. अॉफिस मधे जाऊन वेल्हाळ सरांना विचारले ते म्हणाले बघुन संगतो..
तो पर्यंत कॉमर्सचा पीरियड कर.. पीरियड संपल्या नंतर मला बोलावून घेतले तुझे एॅडमिशन 11thकॉमर्स ला झाले.. त्या वेळेस एॅडमिशन फिस पाच रुपये होती.. उद्या येते वेळेस ५रुपये फिस घेऊन ये आणि पावती घेऊन जा.. नंतर मी त्याच कॉलेज मधे १९८०ला B, com पास झालो.
घरी कापडाचा व्यवसाय आसल्या मुळे वडीलांन सोबत कापडाचा व्यापार करु लागलो.. नौकरी करण्याची इच्छा असुन सुद्धा नौकरी करता आली नाही.. मला १९८२ला स्टेट बँकेत नौकरी लागली होती.. आई वडलांचा नौकरीला विरोध होता..
घरी धंदा आसताना नौकरी कशाला करायची. आणि मी धंद्यात गुंतलो तो कायमचाच.
दुष्काळाची आठवण झाली की समोर चित्र दिसते. जुन्या कटु आठवणी ताज्या होतात.. या घटनेला ४९वर्ष झाली.. जीवणातील संघर्ष मी सत्य कथेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..
तीच पाण्याची परिस्थिती आज मला धारुर मध्ये दिसते आहे. पाणी असुन नियोजन शुन्य असल्याने दुष्काळा सारखे हात होत आहेत.
फरक एवढाच आहे दुष्काळ पडलेला नाही ..पाण्याची परीस्थी तशी निर्माण झाली आहे. जनता पाण्यासाठी तरसते आहे.