विहिरीत (बारवात) पडून मजुराचा मृत्यू..
किल्ले धारुर दि, 12मार्च रोजी दुधाळा मोहल्ला येतील लळ्याजवळील विहीरीत पडून मृत्यू. मिळालेल्या माहितीनुसार इशरत बशीर अली सय्यद हा मिस्त्री बांधकाम करणारा दुधळ्या जवळील बारवात पाणी काढण्यासाठी गेला असता बारवात पडला आणि त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला.
धारुर मधील पाणी टंचाईचा सामना करताना जुन्या वापरात नसलेल्या पडक्या विहिरीतून, बारवातुन लोकांना सांड पाणी जीव धोक्यात घालून आणावे लागत आहे.
इशरत हा घरी परत आला नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी गेले असता तो पाण्यात बुडवून मृत पावलेला आढळून आले. या विषयी मोमीन महंमद शरीफ यांनी दिलेल्या बातमीनुसार अकास्मात मृत्यूची नोंद धारुर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून
पुढील तपास धारुर पोलिस स्टेशनचे ए एस आय चांदने साहेब करत आहेत.
जनतेत पाणी टंचाईचा व ढिसाळ नियोजनाचा बळी अशी उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.