होरपळ……….

पाण्या वाचून जगण्याची पार दैना झाली, दुष्काळ हा मराठवाड्या साठी नवीन नाही. निसर्गाच्या लहरी पणा मुळे कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाची झळ लोकांना सोसावी लागते. पण काय करणार ?मराठवाडा हा बाराही महिने दुष्काळात होरपळलेला. बीड जील्हा ऊसतोड कामगार म्हणुन प्रसिद्ध. मजूर उस तोडीस गेला की मार्केटमध्ये मानूस दिसत नाही. बाजार पेठेत शुकशुकाट..
दुष्काळात तेरावा महिना धारुर शहरात पाण्याचे हाल अपेष्टा. खरच धारुरला कोणी वाली राहीला नाही का?
भर पावसाळ्यात पाण्या वाचून धारुरची जनता तरसते. उन्हाळ्यात तर विचारूच नका. कधी पाईप लाईन फुटते तर कधी मोटार जळते तर कधी लाईट बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडले जाते.
काहीका असेना धारुरची जनता जनार्दन संयंमीच. महिना भर घरात पाण्याचा ठेंब नसला तरी थुंका गिळून बसणार .चार किलोमीटरवरुन डोक्यावर घागर घेऊन येणार पण आवाज उठवणार नाही.
आज भर उन्हाळ्यात पंधरा दिवस झाले नळाला पाणी नाही. पाण्या वाचुन जनता तहाणलेली.. तरी पण प्रशासनाला घाम फुटत नाही. जसे काही त्यांचे जनतेशी देणे घेणे नाही.
धारुर शहराला कायम चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा का होत नाही.?हा जनतेला चाळीस वर्षा पासून पडलेला प्रश्न? तरी पण जनतेने प्रशासनाला एकदाही पाण्याचा कायमचा प्रश्न कधी सुटणार असे विचारले माझ्या ऐकण्यात आले नाही.
निवडणुकी पुरते आश्वासन दिले जाते.. हातात सत्ता आली की कोण जनताआणी कसलं पाणी. मग सत्तेवर कुणी पण येऊ देत..तेच रहाटगाडगे. तिच कॅसेट वाजवली जाते.. पाईप लाईन फुटली, मोटार जळाली, कनेक्शन तोडले..
चाळीस वर्षा पासुन मी पहात आलोय धारुरला पाण्या वाचून वंचित राहावे लागत आहे.  पाण्याच्या हाल अपेष्टाने जनतेचा पिच्छा सोडलाच नाही.
सरकारने राबलण्यात आलेल्या “जलयुक्त शिवार योजना “आणि धरणांना जोडणारा “वॉटरग्रीड”प्रकल्प हा कुठेच नजरेस पडत नाही. असो.. धारुरच्या पाण्याचा कायमस्वरूपी तोडगा, प्रश्न, उपाय, तोड कधी मार्गी लागणार हे देव जाने..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *