लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने प्रशिक्षण संपन्न
बीड दिनांक 11 ( जी मा का) रोजी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कायदा सुव्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली व यंत्रणेंनी सज्ज राहावे, असे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा नियोजन सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी आयोजीत प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. पांडकर, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती तिडके,अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री. देशमुख आणि जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी – कर्मचारी, सर्व तहसीलदार, निवडणूक कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व कक्ष प्रमुख व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूकीच्या संदर्भात विविध विभागांना अचार संहितेमध्ये करावयाच्या कामाचा आज आढावा घेण्यात आला, यावेळी संवेदनशील मतदार केंद्राच्या ठिकाणी भेट देऊन पोलीसांनी घ्यावयाची काळजी, शस्त्र परवानाधारकांनी, अवैद्य शस्त्रधारकांनी शस्त्र पोलीसाकडे जमा करणे, गोंधळ घालणा-या मतदान केंद्राच्या परिसरात वेबकॉस्टींग करणे, गुन्हेगाराची व फरार आरोपीची यादी संबधित पोलीस विभागांनी 2 दिवसात सादर करणे, निवडणुक कालावधीत ग्रामीण भागातील हातभटटी दारु विक्री, शहरी भागातील दारु विक्री, गाजा विक्री, नशेच्या पदार्थावर निवडणूकीच्या अनुषंगाने 48 तास आधी बंदी घालणे, अचारसंहितेच्या काळात वैयक्तीक देवधर्म, जातीयवाद या टिकाटिपणी करु नये, लाच देणे घेणे, भिती दाखविणे, धमकी देणे असे प्रकार घडल्यास लगेच संबधितास कळवावे, धर्मिक स्थळावरुन प्रचार केल्यास पोलीसांच्या लक्षात आणून देणे, अचारसंहिता लागू झाल्याबरोबर 24 तासाच्या आत प्रसिध्दीसाठी लावलेल्या होर्डींग जाहिराती , बॅनर गाडीवरील राजकीय नेत्यांचे फोटो किंवा चिन्ह काडून टाकावे असे निर्देश दिले.
सदरील बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने असुरक्षीत (व्हलनीरेबल) व संवेदनशील (क्रिटीकल) मतदान केंद्र, आचार संहिता, परवानाधारक शत्र जमा करणे, सी-व्हीजील, ई.एस.एम.एस. व एनकोअर यासारख्या मोबाईल ॲप या संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी यांनी अवैद्य दारु बंदीसाठी कडक करावाई करण्याबाबतचे निर्देश दिले.
आज झालेल्या आढावा बैठकी संदर्भात सादरीकरणात जे मतदार संघ अति संवेदनशील आहेत त्याची माहिती लाल रंगाने दर्शवली जावी अशा सूचना देण्यात आल्यात.
निवडणूकीसाठी लागणारे साहित्य निवडणूक विभागाने 2 दिवसात आवश्यक असणारे विभागास विभागास वाटप करावेत. वाहनांची संख्या त्या त्या विभागाने त्वरित कळवावी. त्या अनुषंगाने निवडणूक साहित्य ने- आण , करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. एसटीच्या वाहन चालक यांची यादीही निवडणूकीत सहभाग नोंदवलेल्या कर्मचा-यांची यादी एसटी आगार प्रमुखांनी सादर करावी तसेच निवडणूकीशी संबधित नोडल अधिकारी, संबधित कर्मचारी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांना अचारसंहिता लागल्याबरोबर करायाच्या विविध कामांचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्हयातील सर्व तालुक्यातील मतदान केंद्राची स्थिती अनुषंगिक काम संगणक सादरीकरणाच्या माध्यमातून व जाणून घेतली व त्या त्या विभागास कडक अंमलबजावणीचे आदेश दिले.
तसेच जिल्ह्यामध्ये विविध स्थापीत करण्यात आलेल्या विवीध भरारी पथक, स्थिर संनियंत्रक पथक, व्हीडीओ संनियंत्रक पथक, व्हिडीओ पाहणी पथकांची कार्यपध्दती बद्दल माहिती देण्यात आली. यासह विधानसभा मतदार संघ निहाय विविध बाबी विषयी तयारीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत 2344 मतदान केंद्र, 11 सहायकारी मतदान केंद्र 17 क्रिटीकल व व्हलनीरेबल क्षेत्र निरंक आहेत. तसेच 55 महिला कर्मचारी संचलीत, 11 दिव्यांग कर्मचारी संचलीत, 22 युवा कर्मचारी संचलीत तसेच 318 परदानशीन मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
39 बीड लोकसभा मतदार संघासाठी एकूण 21,15,813 मतदार असून पैकी 11.20,529 पुरुष मतदार, 9,95,245 श्री मतदार व 39 तृतीय लिंगी मतदार यादीत नोंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे बीड कविता जाधव, गेवराई ओंकार देशमुख, माजलगाव वर्षा मन्हाळे, आष्टी प्रमोद कुदळे, केज दीपक वजाळे, परळी अरविंद लाटकर यांनी यावेळी संगणकाद्वारे सादरीकरण केले.