ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न स्वप्न पहा पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा व आई वडिलांचे नाव लौकीक करा – आय. पी. एस. ऑफिसर श्री. कमलेश मीना साहेब शैक्षणिक गुणवत्ते बरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांना वाव देणारे विद्यालय – ज्येष्ठ पत्रकार श्री. राम कुलकर्णी
किल्ले धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बाल संस्कार केंद्र किल्ले धारूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना साहेब अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री राम कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, गट शिक्षणाधिकरी गणेशजी गिरी, शिक्षण विस्तराधिकरी शिवाजी अंडील, स्त्री रोग तज्ञ डॉ. हेमा दिनकर राऊत केंद्रप्रमुख सय्यद हकीम सर, दत्तात्रय कोकणे सर, गंगाधर शिंदे सर सुधीर शिनगारे, नागनाथ सोनटक्के विद्यालयाचे मुख्याध्यापक शेख एस एस हे मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कमलेशजी मीना सर यांनी विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव लौकि करावे असे सर्व विद्यार्थ्यांना सांगत पालकांना मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत ज्ञानदीप विद्यालय हे शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक बौद्धिक व सुप्त कलागुणांना वाव देणारे एकमेव विद्यालय असे कौतुक केले.
यानंतर विद्यालयातील बालकलाकारांनी विविध गीत, पोवाडे, नाटके, देशभक्तीपर गीते, लोप पावत चाललेल्या कलांचे सादरीकरण करत आपला कलाविष्कार सादर केला उपस्थितांची मने जिंकली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील बाल चिमुकल्यांनी करत कार्यक्रमाची शोभा वाढवली या वार्षिक स्नेहसंमेलनातील विद्यालयातील पालक माता पालक धारूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेख एस. एस. व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री. मुंजाराम निरडे व सर्व शिक्षक वृंद यांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.