किल्ले धारूर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा 8 मार्च रोजी युथ क्लबच्या वतीने सत्कार
किल्ले धारूर युथ क्लब सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त धारूर तालुक्यातील 13 महिलांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
किल्ले धारूर युथ क्लब ही सामाजिक संस्था गेली अनेक वर्षे विविध सामाजिक कार्य करत असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 8 मार्च 2024 रोजी महिला दिनानिमित्त धारूर तालुक्यातील एकूण 13 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. शाल स्मृती चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.गंगा एकनाथ शेळके आहेत. कार्यक्रमाचे ठिकाण ऐतिहासिक हुतात्मा स्मारक येथे शुक्रवार, 8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
तरी धारूर तालुक्यातील धारूर शहरातून जास्तीत जास्त महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन किल्ले धारूर युथ क्लबचे अध्यक्ष अभयसिंह चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.