लाईनमन दिना निमित्त अपंग विद्यार्थ्यांना फळाचे वाटप
किल्ले धारूर 4 मार्च रोजी लाईनमन दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून धारूर येथील सर्व लाईनच्या वतीने येथील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करण्यात आले.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 4 मार्च हा लाईनमन दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो धारूर येथे सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी मतिमंद विद्यालय धारूर येथील अपंग विद्यार्थ्यांना धारूर येथील सर्व लाईनमनच्या वतीने फळाचे वाटप करून लाईनमन दिन साजरा करण्यात आला यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप तांबवे रामचंद्र निरडे, निलेश राठोड, रामेश्वर तांबवे सह कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.