आडसच्या बाजारी..प्रा.ईश्वर मुंडे यांनी वाजवली तुतारी https://youtu.be/qYz7eXUi99k?si=L7kUE83cYA9pQP0W
किल्ले धारूर दि.२ रोजी लोकसभेच्या निवडणूका दारावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.बीड लोकसभेची निवडणूक इंडीया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवली जाणार आहे.
खा.शरद पवार यांच्या पक्षाकडून बीड लोकसभेसाठी ईच्छूक उमेदवार प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी बीड जिल्ह्याचा जन संपर्क दौरा पूर्ण करत बाजार तळावर ही भेटी गाठी वाढवल्या आहेत.
बीड जिल्ह्यात जनावरांचा मोठा बाजार समजला जाणारा आडस ता.केज येथे शनिवार दि.२ फेब्रुवारी प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी बाजारात पदयात्रा काढून तुतारी वाजवली.
बाजारातील सर्व लहान मोठे व्यापारी,जन मानसांशी संवाद साधत आपण बीड लोकसभा लढवण्यासाठी ईच्छूक आसून पक्षाने संधी दिली तर आपण लढू आणि संधी नाही दिली तरी जो उमेदवार असेल त्याचा जोरदार प्रचार करून निवडून आणू.
प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे हे उच्च शिक्षीत असून बाजारातील जन सामांन्यांना आपुलकीने बोलताना पाहून सर्व लोक आनंदी होत होते.सोबत तुतारी वादक महादेव शिंदे,अल्प संख्यांक केज सेल केज तालुकाध्यक्ष शेख जब्बार हसन,वैभव पाटील,लहू वाघमारे,गोविंद काळे,बाळू मेहत्रे,कांता आकुसकर,बाळू खाडे,सोमनाथ राजमाने आदी होते.
सविस्तर पहा