आज जो आम्ही सुटा बुटात दिसतो ही जी प्रगती झाली ती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनमुळेच– मा.डॉ राजरत्न आंबेडकर धम्माच्या रक्षणासाठी सज्ज रहा – डॉ जितेंद्र ओव्हाळ
किल्लेधारूर 04 रोजी बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक धारूर शहरामध्ये 3 मार्च रविवार रोजी मोंढा मैदान धारूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृवाखाली हजारो धम्म उपासकांच्या उपस्थित भव्य तिसरी बौध्द धम्म परिषद पार पडली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन मान्यवारंच्या हस्ते करून धम्मरॅली काढण्यात आली तथागथ भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भिखूसंघाला अभिवादन करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ राजरत्न आंबेडकर होते त्यांनी धम्माची गरज आणि धम्म चळवळी बाबत मोलाचे मार्गदर्शन करत या देशाची ओळख जगात फक्त बुद्ध आणि आंबेडकर यांच्या नावानेच होत असल्याचे प्रतिपादन करून आरक्षणाच्या तुलनेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या धम्माने आपल्या जीवनाचं सोनं केल आणि आज जो आम्ही सुटा बुटात दिसतो ही जी प्रगती झाली ती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनमुळेच केल्याचं सांगितलं.
धम्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी धम्मपरिषद आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश धम्म प्रसार असल्याचे सांगत प्रत्येकांने धम्माचे आचरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नसून आता धम्म रक्षण ही आपली जबाबदारी आहे असे आव्हान केले अतिशय आनंदात पार पडलेल्या हजारो उपासकांची उपस्थिती सह तहसीलदार कांबळे साहेब पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब पोलीस निरीक्षक आमन सिरसट पत्रकार, ई.अनेक मान्यवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सनी गायसमुद्रे. यांच्यासह विजयकुमार गायसमुद्रे विकास गायसमुद्रे भागवत गायसमुद्रे रत्नाकर डोंगरे माणिक गायसमुद्रे राजेश सोनवणे बिभीषण भालेराव श्रीपती ओव्हाळ सुखदेव चोपडे डोंगरे पत्रकार रवी गायसमुद्रे महादेव वाघमारे सचिन डावकर विठ्ठल गायसमुद्रे आकाश गायसमुद्रे अमोल सिरसठ अनिल गायकवाड तुषार भालेराव यांच्या सह अनेकांनी परिषद यशस्वी करण्यासाठी शहरातील तालुक्यातील उपासकांनी परिश्रम घेतला.