किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सिंगल व डबल बार क्रीडा साहित्याची सोय
किल्ले धारूर 25 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व तरुणांसाठी प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या प्रोत्साहनाणे प्रेरित होऊन डबल बार व सिंगल tv बार मैदानामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उभे करून दिले. याकरिता माजी विद्यार्थ्यांना कार्यासाठी जे हवे त्या त्याची मदत महाविद्यालयाकडून केली. याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थी ऋषिकेश मधुकर शिनगारे, ऋषिकेश दिलीप सातपुते, दत्ता वशिष्ठ सातपुते, स्थितीज घोडके, व्यंकटेश फने, संजय अशोक शेळके आणि क्रीडा शिक्षक लहू कुमार गव्हाणे सर यांनी योग्य अशी माहिती दिली उभारणीसाठी मदत केली. महाविद्यालयांमध्ये उभे करण्यात आलेल्या क्रीडा साहित्य उभारणी करिता महाविद्यालयातील सर्वच माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे कर्मचारी संजीवन उत्तरेश्वर गुरव यांनी माजी विद्यार्थ्यांना हव्या असणाऱ्या बाबी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. सिद्धेश्वर काळे यांच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.