किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती संपन्न

किल्ले धारूर 23 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. आर. भोसले, डॉ. विजयकुमार कुंभारे, डॉ. जाधव दत्ता यांबरोबरच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच सांस्कृतिक विभागाचे सदस्य डॉ. नितीन कुंभार, प्रा. नागोराव वाघमारे, धारूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांबरोबरच प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचे उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

One thought on “किल्ले धारूर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *