धारूर महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने अभिवादन
किल्ले धारूर 19 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या जयंती निमित्ताने प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे, प्रा. नागोराव वाघमारे, ग्रंथपाल गोपाळ सगर, डॉ. आर. आर. भोसले, डॉ. अनंता गाडे, प्रा. गहिनीनाथ गोयेकर, प्रा. सोळंके, श्री. सुरेश जोगदंड, श्री. अशोक जगताप, श्री. सुरेश जगताप, श्री. आडे, श्री. पंडित, श्री. संदीप टोके, श्री. संजय गुरव यांबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.