किल्ले धारूर युथ क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी अभयसिंह चव्हाण तर सचिवपदी दत्तात्रय गोरे यांची निवड

किल्ले धारूर शहरातील सामाजिक संस्था किल्ले धारूर युथ क्लब दरवर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नवीन कार्यकारिणी जाहीर करते आणि याही वर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नवीन कार्यकारी निवडली.
अध्यक्ष म्हणून अभयसिंह चव्हाण सचिव म्हणून दत्तात्रय गोरे उपाध्यक्ष कदम तसेच कोषाध्यक्ष म्हणून दत्तात्रय बनसोडे यांची निवड झाली या निवडी नंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांना येणऱ्या वर्षात चांगले नियोजन करून भरीव समाज कार्य करता यावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच किल्ले धारूर क्लबचे माजी अध्यक्ष गौतमराव शेंडगे यांनी आयोध्या दौरा करून आल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर झुंजार नेता वर्तमानपत्राचे पत्रकार महादेव देशमुख यांची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले यावेळी किल्ले धारूर युथ क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *