धारूर महाविद्यालयामध्ये चेग इंडिया कंपनीकरिता परिसर मुलाखती संपन्न
किल्ले धारूर 16 फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट सेल अंतर्गत चेग इंडिया कंपनी करिता परिसर मुलाखती ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे नोकरी करण्याची संधी उपलब्ध होऊन रोजगार मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी सुवर्णसंधी आहे असे सांगितले. कंपनीच्या वतीने श्रीमती प्रतीक्षा श्रीवास्तव यांनी मुलाखती घेतल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. अनंथा गाडे यांनी केले. त्यांनी ऑनलाइन मुलाखतींच्या आयोजनासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. या परिसर मुलाखतीमध्ये ऑनलाईन रीतीने 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सिद्धेश्वर काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. अनंथा गाडे यांनी तर आभार डॉ. विजयकुमार कुंभारे यांनी मानले.