मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने धारूर तहसिलवर धरणे आंदोलन.
ग्रामिण भारत बंद मध्ये धारूर तालुक्यातील कामगार , शेतकरी व शेतमजूर यांच्या वतीने संपास पाठींबा देत धारूर तहसिल समोर धरणे आंदोलन करण्यात आले .
या बाबत सविस्तर असे आज डाव्या आघाडीच्या वतीने भारत बंद चे अवहाण केल्यामुळे धारूर तहसिल वर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील समस्या दुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला खर्चावर आधारीत उत्पादन खर्च अधिक 50 % नफा द्या . धारूर तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्याच्या गुराणा दावणीला चारा व पाण्याची सोय करा . ७५४ निराधाराच्या २३ महिन्याचे २०० रुपये प्रमाणे केंद्र शासनाचे अनुदान तात्काळ वाटप करा . शाळेत दिले जाणाऱ्या अंडी व केळीची फरकाची बिले तात्काळ वाटप करा . केरळ राज्यांप्रमाणे शालेय पोषण आहार कामगारांना १८००० रुपये मानधन द्या . धारूर तालुक्यात MREGS ची कामे तात्काळ सुरू करा . शालेय पोषण आहार कामगाराना शासकिय सेवेत कायम करा . कृषी कार्यालयातील शेतकऱ्याची थकित कामे तात्काळ मार्गी लावा . गांजपुर ते कुंबेफळ स्वतंत्र फिटर तयार करा . धारूर ते तांदुळवाडी मार्गे उंदरी व गांजपुर ते केज बस सेवा चालु करा इत्यादी सह अनेक मागण्याचे निवेदन तहसिलदार धारूर यांना निवेदन देण्यात आले .
या वेळी सीटू संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉ डॉ अशोक थोरात , किसान सभेचे जिल्हा कार्यध्यक्ष कॉ काशिराम सिरसट . शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या कॉ मिरा शिंदे , किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ ॲड संजय चोले , तालुका सचिव कॉ दादा सिरसट , कॉ मधुकर चव्हाण , कॉ लक्ष्मण डोंगरे , कॉ लता खेपकर , कॉ सुरेखा निर्मळ , कॉ संजय घोगरे , भाष्कर डायकर . शिवाजी गायकवाड , इत्यादीसह शेतकरी कामगार मोठ्या संख्याने उपस्थित होते , असे दिलेल्या प्रशिद्धी पत्रकात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ डॉ अशोक थोरात यांनी माहिती दिली.