धारूर महाविद्यालयामध्ये कमवा व शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धनादेशांचे वाटप
किल्ले धारूर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर वसंतराव काळे स्वाभिमान कमवा व शिका योजना दहा विद्यार्थ्यांसाठी मंजूर केली. या योजनेमध्ये पदवी स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी परिसरातील स्वच्छता, ग्रंथालय विभागातील काम तसेच औषधी वनस्पती उद्यानातील स्वच्छता करून वृक्षांना, आळे करणे व वृक्षांना पाणी देण्याचे कार्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये रकमेचे धनादेश देण्यात आले. या योजनेत सोळंके ऋतुजा, अवगुणे प्राची, लोकरे पूजा, रुद्रा वंदना, देवकर पायल, गांधले ऋतुजा, मुंडे गोविंद, गायसमुद्रे आदित्य, घोडके सतेज, उंबरे नितीन हे सहभागी होते. याचा उपयोग विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी करावा असा सल्लाही त्यांनी दिला. या योजनेचे समन्वयक म्हणून प्रा. नागोराव वाघमारे हे यशस्वीरित्या कार्य करत आहेत. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक लाखे याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.